महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गॅसलाइट'च्या शूट करण्यासाठी सारा अली खान राजकोटला रवाना - पहा व्हिडिओ - अभिनेत्री सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान रविवारी 'गॅसलाइट' चित्रपटाच्या शूटसाठी राजकोट, गुजरातला रवाना झाली. पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांत मॅसी हा सारा आणि चित्रांगदा सिंग यांच्या सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सारा अली खान राजकोटला रवाना
सारा अली खान राजकोटला रवाना

By

Published : Feb 28, 2022, 1:38 PM IST

मुंबई -बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने गेल्या महिन्यात लक्ष्मण उतेकरच्या चित्रपटाचे काम पूर्ण केले. अभिनेत्री सारा अली आता तिच्या आगामी चित्रपट 'गॅसलाइट'च्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित तिच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सारा गुजरातला रवाना झाली आहे. रविवारी सकाळी ती राजकोटला जाणार्‍या फ्लाइटमध्ये चढताना मुंबई विमानतळावर दिसली.

आगामी चित्रपटाचे तपशील अद्याप गुसदस्त्यात असताना, चित्रांगदा सिंग आणि विक्रांत मॅसी या चित्रपटात सारा सोबत असल्याच्या बातम्या आधीच चर्चेत आल्या आहेत. राजकोटमध्ये टीम चित्रपटाच्या मुख्य भागाचे शूटिंग करणार आहे. ज्यासाठी सारा गुजरातमध्ये पोहोचली आहे.

रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान गुजरातमधील मोरबी येथे मुक्काम करणार असून वांकानेर येथे शूटिंग करेल. चित्रपटाच्या जवळच्या सूत्रांकडून समजले की प्रतिभावान अभिनेता विक्रांतसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करण्यासाठी आणि चित्रांगदा सिंगसोबत 'गॅसलाइट'चे शूटिंग सुरू करण्यासाठी सारा अली उत्सुक आहे.

लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. एक रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे बहुतांशी शूटिंग मध्य प्रदेशमध्‍ये झाले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा -सौंदर्यवती रिया चक्रवर्तीचा पारंपरिक लूक पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details