महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सारा अली खानने आठवड्याची सुरुवात केली 'इन्स्टाग्राम विरुद्ध रिअॅलिटी' फोटोने

सारा अली खानने आठवड्याची सुरुवात 'इन्स्टाग्राम विरुद्ध रिअॅलिटी' ( Instagram vs reality ) या पोस्टने केली आहे. वास्तविक आणि आभासी जगाची झलक दाखवण्यासाठी साराने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.

सारा अली खान
सारा अली खान

By

Published : Jan 10, 2022, 2:26 PM IST

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानच्या ( Bollywood actor Sara Ali Khan ) इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये तिने शेअर केलेले फोटो वास्तव आणि अभास निर्माण करणारा आहे. नर्मविनोदासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने आठवड्याची सुरुवात 'इन्स्टाग्राम विरुद्ध रिअॅलिटी' ( Instagram vs reality ) पोस्टने केली आहे.

आनंद एल रायच्या 'अतरंगी रे' या चित्रपटामध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर, साराने आधीच विकी कौशलसोबत आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ती चित्रपटांमध्ये कितीही व्यग्र असली तरीही, सारा तिच्या सोशल मीडिया गेमला हलक्यात घेत नाही. तिच्या नवीन इंस्टाग्राम स्टोरींनी हे सिद्ध केले आहे की तिच्याकडे डिजिटल आशय निर्मितीचे सर्व गुण आहेत.

सारा अली खान

सोमवारी सकाळी सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर फॉलोअर्सना तिच्या आभासी आणि वास्तविक जगाबद्दल योग्य कल्पना देण्यासाठी दोन फोटो शेअर केले आहेत. तिच्या मालदीवच्या सुट्टीतील हे थ्रोबॅक फोटो आहेत. पहिल्या फोटोत सारा निळ्या फुलांची बिकिनी परिधान करून कॅमेऱ्याला पोज देत आहे. याला तिने इन्स्टाग्रमसाठी पोज असल्याचे म्हटलंय. दुसऱ्या फोटोत तिने वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यात झोपेतून जागे झालेल्या आळशी साराच्या हातात चहाचा कप दिसत असून सभोवार निळा अथंग समुद्र दिसत आहे.

सारा अली खान

दरम्यान, साराचा विकी कौशलसोबतचा आगामी चित्रपट हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आहे. हा रोमंटिक चित्रपट उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर चित्रीत होत आहे. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा -Hrithik Roshan Birthday : हृतिक रोशनच्या या आजारापुढे डॉक्टरांनीही टेकले होते हात

ABOUT THE AUTHOR

...view details