महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Lock down : सारा अली खानने शायरीतून दिला खास संदेश, पाहा फोटो - सारा अली खान

साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हूला हूप करताना दिसते. तसचं या फोटो सोबत तिने चाहत्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Sara Ali khan gives Special messege from her recent instapost
Lock down : सारा अली खानने शायरीतून दिला खास संदेश, पाहा फोटो

By

Published : Apr 5, 2020, 12:59 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार देखील घरात वेळ घालवत आहेत. अभिनेत्री सारा आली खान देखील सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून शायरीतून एक संदेश दिला आहे.


साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हूला हूप करताना दिसते. तसचं या फोटो सोबत तिने चाहत्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.


सारा अली खानने हा फोटो शेयर करून एक शायरी पोस्ट केली आहे. तिने यामध्ये लिहिलं आहे, की 'मला माहिती नाही मला का सूर्याची आठवण येत आहे. आकाशाची आठवण येत आहे'. जसे तुम्ही अंडा फ्राय करता त्याप्रमाणेच हूला-हूप नक्की करून पाहा. मात्र, घराबाहेर पडू नका. काळजी घ्या'.

साराप्रमाणेच इतर कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details