मुंबई - अभिनेत्री सारा अली खान आपला भाऊ इब्राहिम अली खानसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यांचे सुट्टीतील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. अलिकडेच साराने एक फोटो शेअर केलाय त्यात ते पाण्यात पोहताना दिसत आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये साराने लिहिलंय, जेव्हा निळ्या रंगाची अनुभूती घेणे आवडते. साराने भावासोबत सुट्टी एन्जॉय करीत असतानाचा आणखीनही काही फोटो शेअर केले आहेत.
सारा अली खान आणि इब्राहिम यांच्यातील नाते अतिशय घट्ट आहे. इब्राहिम आणि आपला छोटा भाऊ तैमुरसोबतचे फोटो सारा अली नेहमी शेअर करीत असते.
कामाच्या पातळीवर सारा अली खान आगामी कुली नं. १ या चित्रपटात वरुण धवनसोबत झळकणार आहे. वरुणने नव्या वर्षात या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले आहे. यात वरुणच्या बाहुपाशात सारा अली खान दिसत आहे. याच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहिलंय, नवीन वर्षात नवा फोटो तर हवाच. आपल्या हिरॉईनला घेऊन येत आहे..कुली न. १ हा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वरुण शिवाय सारा अली खान कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटातही झळकणार आहे.