मुंबई- कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. एका चॅट शोदरम्यान साराने आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. यानंतर दोघांतील जवळीकताही वाढताना दिसली. कार्तिक अनेकदा सारासोबत स्पॉट झाला आहे. अशात नुकतंच कार्तिकने दिल्लीतही एका फॅशन शोसाठी सारासोबत हजेरी लावली.
साराचा रॅम्प वॉक पाहून कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ - सिनेमा
फॅशन शोमधील साराचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तर यात कार्तिक आणि साराचा भाऊ इब्राहिमचीही झलक पाहायला मिळत आहे. दोघंही साराला चिअर अप करताना दिसत आहेत.
या फॅशन शोमधील साराचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तर यात कार्तिक आणि साराचा भाऊ इब्राहिमचीही झलक पाहायला मिळत आहे. दोघंही साराला चिअर अप करताना दिसत आहेत. तर मीडियाचा कॅमेरा कार्तिककडे वळताच कार्तिकच्या चेहऱ्यावर हास्य आलं असून तो यात लाजताना दिसत आहे.
दरम्यान सारा आणि कार्तिकची जोडी लवकरच ऑनस्क्रीनही एकत्र झळकणार आहे. इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात या दोघांची वर्णी लागली असून सिनेमाचं चित्रीकरणही काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं. या सिनेमाचं शीर्षक अद्याप निश्चित झालेलं नाही. अशात आता दोघांचेही चाहते त्यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.