मुंबई- ईदच्या निमित्ताने अभिनेत्री सारा अली खानने आपला एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा अलीने शेअर केलेला फोटो तिच्या लहानपणीचा आहे, तर दुसरा अलिकडचा आहे. लहान साराने हिजाबच्या जागी आपल्या डोक्यावर दुपट्टा बांधला आहे आणि हलक्या मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तरुण साराने आपला चेहरा काळ्या दुप्पट्याने झाकला आहे आणि कॅमेऱ्याला पोज दिली आहे. या खास फोटोला तिने कॅप्शन दिलीय, 'ईद मुबारक #स्टेसेफ #स्टेहोम #स्टेपॉझिटिव्ह.'
अनेक फिल्मी सिताऱ्यांनी ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. यात हेमा मालिनी यांनी म्हटलंय, ईद साजरी करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
रणदिप हुडाने आपल्या शाही लूकने आणि खट्याळ स्टाईलने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे, 'रै सबनै ईद की राम राम #ईदमुबाक, सर्व जबाबदार लोक परिवारासह ईद साजरी करीत आहेत आणि सुरक्षित आहेत, अशी अपेक्षा करतो. . #पीस.
उर्मिला मातोंडकरने चंद्राचा फोटो शेअर करीत मुबारक म्हटले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, ईदचा चांद काहीसा असा आहे जो खरा, सुंदर आणि खास आहे. तुम्हा सर्वांना है #चांदमुबारक. तुम्हा सर्वांना भरपूर खूशी, शांती आमि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले आरोग्य लाभो. #ईदमुबारक2020 #ईदअलफित्र.'
रविना टंडननेही सुंदर पोशाख परिधान करुन पोज दिली आहे. फोटोच्या मागे मिनार आणि चांदसोबत तिने ईद मुबारक असे लिहिले आहे.
हुमा कुरेशीने चंद्र उगवल्याच्या मुबारक बात देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.