मुंबई -'संजय राऊत जी, तुम्ही मला 'हरामखोर' म्हणाले. यावर, ही तुमची मानसिकता दर्शवते, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रणौत हिने दिली आहे. तसेच जर मी मुंबई पोलिसांवर किंवा मी तुमच्यावर टीका करते, तर तुम्ही म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुमचे लोक मला धमकावत आहेत. तरीही मी नऊ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, असे आवाहनही अभिनेत्री कंगना रणौतने दिले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई आणि महाराष्ट्राविरुद्ध केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. कंगनाने एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके) केली होती. यावरुन वाद सुरू आहे.
शहर पोलिसांना बदनाम करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करावी, असे आवाहन राऊत यांनी राज्य सरकारला शुक्रवारी केले होते. तसेच, त्यांनी कंगनालाही प्रथम पीओकेला जाऊन तेथील परिस्थिती पहाण्यास सांगितले होते. कंगना सध्या तिचे मूळ राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात आहे. तिने आपण 9 सप्टेंबरला मुंबईला परत येणार असल्याचे सांगून आपल्याला अडवण्याची हिंमत करून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. त्यावर आता कंगनानेही प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली, तुमचे लोक मला धमकावत आहेत. तरीही मी नऊ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, असे आवाहनही अभिनेत्री कंगना रणौतने दिले आहे.
तर अभिनेत्री कंगना रणौत हिने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलीस व मुंबई शहराबाबत केलेल्या ट्विट मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आता यात शिवसेनेच्या महिला आघाडीने देखील उडी घेतली. शनिवारी शिवसेनेच्या महिला आघाडीकडून मुंबईत ठिकठिकाणी कंगना विरोधात आंदोलन करण्यात आले.