महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ईन्शाअल्लाह' पुढील ईदला भाईजानचा नवा चित्रपट, आलिया भट्टही झळकणार - Alia Bhatt

संजय लिला भन्साळींचं दिग्दर्शन असणाऱ्या 'ईन्शाअल्लाह' या चित्रपटातून सलमान २०२० मध्ये ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे.

'ईन्शाअल्लाह' पुढील ईदला भाईजानचा नवा चित्रपट

By

Published : Jun 6, 2019, 7:59 PM IST

मुंबई - 'हम दिल दे चुके सनम' या सुपरहिट चित्रपटासाठी सलमान खाननं संजय लिला भन्साळींसोबत काम केलं होतं. या चित्रपटानंतर म्हणजेच सुमारे १९ वर्ष दोघांनीही एकमेकांसोबत काम केलं नाही. अशात दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील ईदला सलमानच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे.

संजय लिला भन्साळींचं दिग्दर्शन असणाऱ्या 'ईन्शाअल्लाह' या चित्रपटातून सलमान २०२० मध्ये ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. तर या चित्रपटात सलमानसोबत आलिया भट्ट मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया आणि सलमान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट नक्कीच खास ठरणार आहे. निश्चितच 'भारत'नंतर आता भाईजानच्या या बिगबजेट चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असणार.

ABOUT THE AUTHOR

...view details