मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या नव्या चित्रपटाबद्दलची बातमी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. 'गंगुबाई काठीवाडी' हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
भन्साळींच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये 'लेडी डॉन' साकारणार आलिया भट्ट - Sanjay Leela Bhansali latest news
संजय लीला भन्साळी यांनी अखेर आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असेल याचीही त्यांनी स्पष्टता दिली आहे. 'गंगुबाई काठीवाडी' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.
'गंगुबाई काठीवाडी' या चित्रपटाची निर्मिती भन्साळी प्रॉडक्शन आणि जयंतीलाल गड्डा यांच्या 'पेन इंडिया'च्यावतीने केली जाणार आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
'गंगुबाई काठीवाडी' हा चित्रपट 'अंडरवर्ल्ड महिला डॉन'वर आधारित आहे. ही डॉन कॉन्ट्रॅट किलर, ड्रग माफिया असणार आहे. त्यामुळे आलियाची भूमिका आजपर्यंतच्या भूमिकेहून पूर्ण वेगळी असेल. ती ही व्यक्तीरेखा कशी साकारणार हे पाहण्यासारखे असेल. यातील इतर कलाकार अद्याप निश्चित झाले नसले तरी आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.