मुंबई- लॉकडाऊनचा फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृहे आणि शूटींग बंद होतं. अशात आता महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. याच दरम्यान 'मुंबई सागा' सिनेमाचा उर्वरित भाग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे शूट केला जाणार आहे. हा सिनेमा कशाप्रकारे शूट केला जाणार आहे, याबद्दल निर्माता संजय गुप्ता यांनी माहिती दिली.
रामोजी फिल्म सिटीत होणार 'मुंबई सागा'चे उर्वरित चित्रीकरण, संजय गुप्तांची माहिती - रामोजी फिल्म सिटीत 'मुंबई सागा'चे चित्रीकरण
संजय गुप्ता यांनी सांगितलं, की चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. अशात सिनेमाचा उर्वरित भाग शूट करण्यासाठी आम्ही रामोजी फिल्म सिटी येथे जाणार आहोत. याठिकाणी दोन सेट उभारले गेले असून सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरील लोकांना या सेटवर प्रवेश दिला जाणार नाही.

पुढे ते म्हणाले, आम्ही काही ठराविक लोकांना सोबत घेऊन चित्रीकरणासाठी जाणार आहोत. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणचे लोक येत असतात. त्यामुळे, तिथे सुरक्षेची हमी दिली जाऊ शकत नाही. चित्रपटातील कलाकार आणि कामगारांच्या जीवाला धोका न पोहोचू देता हे काम करायचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. 'मुंबई सागा' या सिनेमात जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, इमरान हाश्मी आणि गुलशन ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
TAGGED:
mumbai saga starcast