महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'प्रस्थानम'चे जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज, संजय दत्तचा पाहायला मिळणार नवा अवतार - Prasthanam

संजय दत्तची भूमिका असलेल्या प्रस्थानम चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. तेलुगु चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट २० सप्टेंबरला रिलीज होईल.

संजय दत्त

By

Published : Jul 4, 2019, 6:59 PM IST


मुंबई - संजय दत्तची महत्त्वाची भूमिका असलेल्या 'प्रस्थानम' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर पर्दर्शित झाले आहे. मल्टीस्टारर असलेला हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

'प्रस्थानम' हा तेलुगुमध्ये गाजलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याचे दिग्दर्शन देवा कट्टा हे करीत आहेत. प्रस्थानम, हा एका बाहुबली राजकीय नेत्याची आणि त्याच्या कौटुंबिक नात्याची कथा आहे.

मोशन पोस्टर खूपच प्रभावी आहे. रिव्हॉल्वरच्या नळीवर सिंहासन दाखवण्यात आलंय. राजकारण आणि शक्ती यांचे हे प्रतिक आहे. संजय दत्तनेही हे पोस्टर शेअर केले असून कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''ताकत, मोह, प्रेम आणि मानवी मिथ्यांवर आधारित मिळालेला एक वारसा हक्क. प्रस्थानम २० स्पटेंबर २०१९ ला रिलीज होईल.''

प्रस्थानम चित्रपटात संजय दत्त, मनिषा कोइराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमर्या दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details