मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तची थोरली मुलगी त्रिशाला दत्त हवाई सुट्टीचा आनंद घेत आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या त्रिशला हिने तिच्या बीचवरील सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. संजय दत्तची दिवंगत पत्नी ऋचा शर्माची मुलगी त्रिशला हवाई सुट्टीतील या फोटोमध्ये पोहण्याच्या कपड्यात दिसत आहे.
मंगळवारी त्रिशलाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम उकाऊंटवरुन आपल्या सुमारे 52 लाख फॉलोअर्सना फोटो पोस्ट करुन एक झलक दाखवली. मोनेकिनी कटआऊटमधील त्रिशलाच्या या फोटोवर प्रचंड प्रतिक्रिया आलेल्या पहायला मिळत आहेत. त्रिशला ही व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ आहे. या फोटोत ती निळंशार पाणी, रुपेरी वाळू आणि उन्हाचा आनंद घेत आहे.