महाराष्ट्र

maharashtra

बाबाच्या चाहत्यांना खुशखबर.. संजय दत्तने कॅन्सरवर केली मात, फॅन्सना म्हणाला..

By

Published : Oct 21, 2020, 4:33 PM IST

Updated : Oct 21, 2020, 7:26 PM IST

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा गेले काही महिने फुफ्फुसांच्या कॅन्सरने आजारी होता. मात्र आता या आजारातून पूर्ण बरे झालो असल्याची बातमी खुद्द त्यानेच आपल्या चाहत्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खास पोस्ट टाकून दिलेली आहे.संजय दत्तच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे

Sanjay Dutt
संजय दत्त

मुंबई - संजय दत्तने आपण आजारातून बरा झालो असल्याचे ट्विट करुन आपल्या चाहत्यांना कळवले आहे. त्याला कॅन्सर झाल्याचे निदान काही दिवसापूर्वी झाले होते. त्यानंतर तो उपचार घेत होता. आता या दुर्धर आजारातून मुक्त झाल्याचे कळवले आहे.

त्याने ट्विटरवर लिहिलंय, ''गेली काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कठीण गेले. पण जसे म्हटलं जातं की, सर्वात कठीण लढाईमध्ये ईश्वर आपल्या मजबूत योध्याला विजय देतो. आज माझ्या मुलाच्या वाढदिवशी मी ही लढाई जिंकलो आहे.''

संजय दत्तने पुढे म्हटलंय, ''हे सर्व तुमचा विश्वास आणि पाठिंब्याशिवाय मुश्किल होते. मी माझ्या कुटुंबियांचा, मित्रांचा आणि चाहत्यांचा मनापासून आभारी आहे, ज्यांनी मला साथ दिली.''

त्यासोबत मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर परिचारिका आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचे त्याने आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी संजयने याच सोशल मीडियावर पोस्ट टाकून काही काळ कामापासून लांब राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. अचानक असा निर्णय घेण्यामागील कारणचा शोध घेतला असता त्याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तो कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र कोर्ट केसमुळे त्यांच्या परदेशात उपचार घेण्याला मर्यादा आल्यामुळे त्याने भारतातच पुढील उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

सध्या संजय अराम करत असला तरीही लवकरच तो यशराजच्या शमशेरा या सिनेमाच्या शुटिंगला पुन्हा सुरुवात करेल त्यासोबतच केजीएफच्या दुसऱ्या भागाच्या प्रमोशनला देखील तो लवकरच सुरुवात करनार असल्याच समजतंय.

काही दिवसापूर्वी संजय दत्तने पहिल्यांदाच कर्करोगाशी लढत असल्याचा एका व्हिडिओतून खुलासा केला होता. हा व्हिडिओ त्याचा मित्र सेलेब्रिटी हेअरस्टायलिस्ट अलिम हाकीमने शेअर केला आहे. कॅन्सरमुळे डोक्यावर आलेले व्रण दाखवताना संजय दत्त म्हणतो, "सलूनमध्ये परत येणे, केस कापणे चांगले आहे. तुम्ही पाहा की माझ्या आयुष्यात हे व्रण अलिकडेच तयार झालेत, परंतु मी कॅन्सरला हरवणार."

व्हिडिओमध्ये सजय दत्त 'केजीएफ' चित्रपटाच्या शूटिंगसाठी दाढी करीत आहे. तो म्हणाला, ''नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नव्या लूकची गरज आहे. मी परत एकदा सेटवर परतल्याने खूश आहे. 'शमशेरा'ची डबिंगही सुरू झाली आहे.''ऑगस्टमध्ये कर्करोगाच्या निदानानंतर संजय दत्तला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्याकिय उपचारासाठी काही दिवस कामातून विश्रांती घेणार असल्याचे त्याने म्हटले होते.

वर्षापूर्वी संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये त्याचा अनोखा जीवन प्रवास दाखवण्यात आला होता. त्याची आई नर्गिस दत्त यांनाही कॅन्सरने गाठले होते. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले होते. त्या प्रसंगात संजय दत्त किती हवालदिल झाला होता याचे चित्रण पाहायला मिळते. त्याच दुर्धर आजाराने संजयला गाठल्यामुळे एक चिंतेचे वातावरण त्याच्या कुटुंबियात पसरले होते. मात्र आजा त्याने दिलेल्या या आनंदाच्या बातमीने त्याचा परिवार आणि बॉलिवूडचा मोठा परिवार सुखावला असेल.

Last Updated : Oct 21, 2020, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details