मुंबई - अभिनेता संजय दत्तचा मुलगा शाहरान सध्या कराटे शिकत आहे. बऱ्याच मेहनतीने आणि सरावाने त्याने फुल्ल स्लिप्ट केली आहे. आपल्या मुलाचा अभिमान बाळगत संजूबाबाने त्याचा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
संजय दत्तने शुक्रवारी मुलाचा फुल्ल स्लिप्ट करीत असतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. शाहरन ९ वर्षांचा आहे.
संजय दत्तने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''याने अनेक दिवसांच्या प्रॅक्टिसनंतर फुल्ल स्लिप्ट अखेर करुन दाखवली. माझा लिटल कराटे किड.''त्याने पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच संजयची पत्नी मान्यता दत्तने आपली प्रतिक्रिया दिली आणि आपल्या मुलावरचे प्रेम व्यक्त केले.
कामाच्या पातळीवर संजय दत्त अलिकडेच' पानिपत' चित्रपटात झळकला होता. अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. यातील संजय दत्तच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. नव्या वर्षात त्याचा 'सडक २' हा चित्रपट येतोय. पूजा भट्टच्या 'सडक' चित्रपटाचा हा सीक्वल आहे. आलिया भट्ट यात काम करीत आहे.