महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी संजू बाबा मैदानात, 'जादू की झप्पी'साठी मतदारांची झुंबड - loksabha election

संजय दत्त प्रचाराला येणार म्हटल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. बाबनेही लोकांना हात उंचावून तर कुणाचा हात हातात घेऊन त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला.

प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी संजू बाबा मैदानात

By

Published : Apr 24, 2019, 8:21 AM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात येत्या २९ एप्रिलला मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक उमेदवार आपल्याला शक्य तेवढा जोर लावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या प्रिया दत्त यांच्यासाठी प्रचार करायला आता त्यांचा भाऊ म्हणजेच अभिनेता संजय दत्त मैदानात उतरला आहे.

वांद्रे परिसरातील रॅलीनंतर मंगळवारी संजुबाबाने या मतदारसंघातील चुनाभट्टी परिसरात रोड शो करून मतदारांना आपल्या बहिणीला मतदान करण्याचं आवाहन केलं. संजय दत्त प्रचाराला येणार म्हटल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. बाबनेही लोकांना हात उंचावून तर कुणाचा हात हातात घेऊन त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला.

प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी संजू बाबा मैदानात

खरं तर या रोड शो मध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त सहभागी होणार होत्या. मात्र एकदा संजूबाबाला पाहिल्यानंतर लोकांना प्रिया यांचा साफ विसर पडला. लोकांनी मोबाईल हातात घेत संजयची एक झलक मिळावी यासाठी मोठी गर्दी केली. काहींनी तर थेट गाडीवर चढून आपल्या लाडक्या मुन्नाभाई सोबत जादू की झप्पी घेण्याचा प्रयत्न केला. अखेर चुनभट्टी आयटीआय कॉलेजपासून सुरू झालेला हा रोड शो कुर्ला येथील बकरी अड्डा परिसरात येऊन संपला. आता संजयच्या या रोड शोचा बहीण प्रियाला निश्चितच फायदा होईल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details