मुंबई- अभिनेता संजय दत्तने पहिल्यांदाच कर्करोगाशी लढत असल्याचे एका व्हिडिओतून खुलासा केला आहे. हा व्हिडिओ त्याचा मित्र सेलेब्रिटी हेअरस्टायलिस्ट अलिम हाकीमने शेअर केला आहे. कॅन्सरमुळे डोक्यावर आलेले व्रण दाखवताना संजय दत्त म्हणतो, "सलूनमध्ये परत येणे, केस कापणे चांगले आहे. तुम्ही पाहा की माझ्या आयुष्यात हे व्रण अलिकडेच तयार झालेत, परंतु मी कॅन्सरला हरवणार."
कामावर परतला संजय दत्त, म्हणतो हरवणार 'कॅन्सर'ला - 'कॅन्सर'ला हरवणार संजय दत्त
संजय दत्त याने आपण कॅन्सरशी झुंज देत असून त्याला हरवणार असल्याचे म्हटले आहे. त्याचा मित्र सेलेब्रिटी हेअरस्टायलिस्ट अलिम हाकीमने संजय दत्तचा व्हिडिओ शेअर केलाय. तो आता शूटिंगच्या कामावर परतला आहे.
संजय दत्त
व्हिडिओमध्ये सजय दत्त 'केजीएफ' चित्रपटाच्या शूटिंगसाठी दाढी करीत आहे. तो म्हणाला, ''नोव्हेंबरमध्ये सुरू गहोणाऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नव्या लूकची गरज आहे. मी परत एकदा सेटवर परतल्याने खूश आहे. 'शमशेरा'ची डबिंगही सुरू झाली आहे.''
ऑगस्टमध्ये कर्करोगाच्या निदानानंतर संजय दत्तला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्याकिय उपचारासाठी काही दिवस कामातून विश्रांती घेणार असल्याचे त्याने म्हटले होते.