मुंबई- अभिनेता संजय दत्त प्रस्थानम सिनेमानंतर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. कन्नड सुपरस्टार यश याची मुख्य भूमिका असलेला केजीएफचा पहिला भाग काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या प्रचंड गाजलेल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच केजीएफ २ मध्ये संजू झळकणार आहे. या सिनेमात संजू बाबा अधिराची भूमिका साकारणार आहे.
हैदराबादमध्ये संजूबाबा करतोय 'केजीएफ २'चं चित्रीकरण, पाहा फोटो - sanjay dutt's upcoming movie
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील संजूबाबाच्या पात्राबद्दलची घोषणा झाली होती. यानंतर आता सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रशांत नील यांनी संजयसोबतचे सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील संजूबाबाच्या पात्राबद्दलची घोषणा झाली होती. यानंतर आता सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रशांत नील यांनी संजयसोबतचे सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या महाकथेचा शेवट कसा होतो, चला पाहूया, असं कॅप्शन प्रशांत यांनी या फोटोला दिलं आहे.
सध्या संजूबाबा आपल्या या चित्रपटाचं हैदराबादमध्ये चित्रीकरण करत आहे. संजय या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील संजय दत्तचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. आता केजीएफच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.