मुंबई- लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची दुसरी लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या डबेवाल्यांचेही हाल होत आहेत. या डबेवाल्यांसाठी आता बॉलिवूडच्या संजूबाबानेही चिंता व्यक्त केली आहे. सोबतच या कठीण परिस्थितीत डबेवाल्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
लॉकडाऊनचा मुंबईच्या डबेवाल्यांवर परिणाम, संजय दत्तने शेअर केली पोस्ट - लॉकडाऊनचा मुंबईच्या डबेवाल्यांवर परिणाम
संजय दत्तने सोशल मीडियावर याबद्दल बोलताना म्हटलं, डबवाले गेल्या अनेक दशकांपासून आपल्याला सेवा पुरवत आहेत. बर्याच काळापासून ते मुंबईकरांपर्यंत अन्न पोहोचवत आहेत. आता वेळ आली आहे, आपण पुढे येऊन त्यांची मदत करण्याची गरज आहे.

असलम शेख यांनी ट्विट केले होते, की डबेवाले हे मुंबईची दुसरी लाईफलाईन आहेत. गेल्या 100 वर्षांपासून ते दररोज आपल्याला सेवा देत आहेत. आता या कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार त्यांच्यासोबत आहे. शेख यांच्या या ट्विटनंतर संजय दत्तनेही याबद्दल ट्विट केले. याआधीही संजय दत्तने मुंबईतील हजारो कुटुंबीयांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.