मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे आणि त्यातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहिला. या चर्चांशिवाय संजूबाबचं खासगी आयुष्यही चांगलंच वादग्रस्त राहिलं. अशात आता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याचा आगामी मराठी चित्रपट.
भावनांना भाषा नसते; संजूबाबाची मराठीत एन्ट्री, म्हणाला हा चित्रपट माझ्या 'बाबां'साठी - baba
संजय दत्त लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून यानिमित्ताने तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'बाबा' असं या सिनेमाचं शीर्षक आहे. हा चित्रपट आपण आपल्या वडिलांना समर्पित करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
संजय लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून यानिमित्ताने तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'बाबा' असं या सिनेमाचं शीर्षक आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती देत त्यानं चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट आपण आपल्या वडिलांना समर्पित करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
माझे वडील संपूर्ण आयुष्यभर प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, लव यू डॅड असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भावनांना भाषा नसते, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. पोस्टरमध्ये एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत सायकलवर बसून चाललेला दिसत आहे. दरम्यान संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार करणार आहेत. तर राज गुप्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.