महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेता संजय दत्त नियमित चेकअपसाठी लिलावतीमध्ये...भारतातच उपचार सुरु केल्याची चर्चा - Sanjay Dutt came in lilavati hospital

मागील आठवड्यात अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची तपासणी केली असता चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.

Sanjay Dutt
संजय दत्त बहिण प्रिय दत्त बरोबर रुग्णालयात

By

Published : Aug 16, 2020, 8:30 PM IST

Updated : Aug 16, 2020, 8:58 PM IST

मुंबई -मागील आठवड्यात फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अभिनेता संजय दत्त आज(रविवार) पुन्हा मुंबईतील लीलावती रुग्णालयात नियमित चेकअपसाठी येऊन गेला. यावेळी त्याची बहीण प्रिया दत्त देखील त्याच्या सोबत होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची तपासणी केली असता चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.

संजय दत्त

दत्त कुटुंबियांपैकी कुणीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नाही. त्यानंतर तो पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याची बातमी पुढे आली होती. मात्र, शस्त्रास्त्रे प्रतिबंधक कायद्याखाली दोषी आढळल्यामुळे त्याला व्हिसा मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो पुढील उपचारासाठी सिंगापूरला रवाना होईल अशी चर्चा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विमान आणि व्हिसा मिळण्यात अडचणी असल्याने तोवर मुंबईत त्याने आपल्यावरील उपचार सुरू केल्याचे बोलले जात आहे.

संजय दत्त बहिण प्रिया दत्त बरोबर रुग्णालयात
असं असलं तरीही संजयने काही दिवसांपूर्वी आपण कामातून ब्रेक घेणार असल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं होतं. मात्र, त्याच्या आगामी 'सडक टू'च डबिंगचं काही काम शिल्लक असल्याने ते पूर्ण करून मगच तो ब्रेक घेणार असल्याची इंडस्ट्रीत चर्चा आहे. पत्नी मान्यता अथवा बहिण प्रिया यापैकी कुणीही संजयला नक्की काय झालं, यास दुजोरा दिलेला नाही. मात्र, मान्यताने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात संजू एक 'फायटर' असून तो या परिस्थितीतून नक्की सुखरूपणे बाहेर पडेल अशी आशा व्यक्त केली होती.
Last Updated : Aug 16, 2020, 8:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details