महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ एकाच फोटोत कैद - Sanjay Dutt meets Musharraf

इंटरनेटच्या भव्य प्रसारामुळे कोणतीही आणि कुठेही घडलेली गोष्ट क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यात बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ एकाच फोटोत दिसत आहेत. मुशर्रफ आणि दत्त यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाहीये की खंडनही केलेलं नाहीये. मात्र ही गोष्ट नेटकऱ्यांना रुचलेली दिसत नाहीये.

संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ
संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ

By

Published : Mar 18, 2022, 1:22 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची ही भेट दुबई मध्ये घडल्याचे वर्तविले जात आहे. परवेझ मुशर्रफ हे प्रकृती अस्वास्थामुळे व्हील चेयर बसलेले दिसत असून संजय दत्त कुणाकडे तरी अंगुलीनिर्देश करताना दिसतोय. मुशर्रफ हे आखाती देशातील दुबई येथे वास्तव्यास असतात आणि संजय दत्तचे सुद्धा दुबईमध्ये घर आहे. दुबईला गेलेली त्याची पत्नी आणि मुले पहिल्या लॉकडाऊनमध्ये तिथेच अडकली होती आणि संजय दत्त एकटाच मुंबईत होता.

संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ

दत्त आणि मुशर्रफ या दोघांचे वास्तव्य दुबईत असल्याकारणाने त्यांची भेट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या भेटीमुळे पुन्हा एकदा संजय दत्तवर टीका केली जात आहे.

अलीकडेच, संजय दत्त ने दिल्ली आणि जयपूरमध्ये 'घुडचडी' चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं. केएजीएफ चॅप्टर २ मध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारत असून शमशेरा, पृथ्वीराज या चित्रपटांमध्ये देखील तो दिसणार आहे.

हेही वाचा -Happy Holi 2022 : अमिताभ, अक्षय, कपिल शर्माने दिल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details