मुंबई- टेनिसपटू सानिया मिर्झा 'एमटीव्ही निषेध अलोन टूगेदर' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. या शोचे उद्दीष्ट क्षयरोग (टीबी) विषयी जागरूकता निर्माण करणे असल्याचे तिने म्हटलंय. या फिक्शन मालिकेत सानिया भूमिका साकारताना दिसणार आहे. टीबीविषयी जागरूकता वाढविणे आणि योग्य औषधे घेण्याचे महत्त्व, याबद्दल जागरुकता करण्यासाठी यावर्षी जानेवारीत टीव्ही शो 'एमटीव्ही निषेध' चा प्रीमियर झाला होता.
सानिया म्हणाली, "टीबीचा आजार ही आपल्या देशातील सर्वात जुनी आरोग्यसमस्या आहे. टीबीची निम्मे प्रकरणे तर ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची आहेत. या आजाराशी सामना करण्याची आणि समज बदलण्याची तातडीने गरज आहे."
हेही वाचा - मिलिंदचा नवा फोटो पाहून चाहत्यांना आली अक्षय कुमारची आठवण