महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सना खानने सोडली फिल्म इंडस्ट्री, मानवतेची सेवा करण्याचे घेतले व्रत - Goodbye to Sana Khan's show

अभिनेत्री सना खान हिने फिल्म इंडस्ट्री सोडून देऊन मानवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढा शो-बिजच्या कामासाठी मला आमंत्रण देऊ नका अशी विनंतीही तिने आपल्या बॉलिवूडमधील सहकाऱ्यांना केली आहे.

Sana Khan
सना खान

By

Published : Oct 9, 2020, 4:47 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडियावरुन तिने याची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक पत्र लिहून आपला निर्णय सर्वांना कळवला आहे.

सना खानने लिहिलंय, ''भावांनो आणि बहिणींनो, आज मी आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावरुन आपल्याशी बोलत आहे. मी काही वर्षांपासून मनोरंजन जगतात आयुष्य घालवले आहे. या काळात मला सर्व प्रकारची प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती मिळाली ज्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, परंतु आता काही दिवसांपासून माझ्या मनात प्रश्न येत आहे की, माणसाचे या दुनियेत येणे हे केवळ संपत्ती आणि कीर्ति मिळवण्यासाठीच आहे का?

तिने लिहिलंय, ''जे लोक निराधार आहेत अशा लोकांसाठी सेवा करण्यात आयुष्य घालवावे, हे त्याचे कर्तव्य ठरत नाही का? कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो, हा विचार माणसाने करायला नको का? आणि मेल्यानंतर काय होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे मी बऱ्याच काळापासून शोधत आहे. खास करून या दुसऱ्या प्रश्नाचे, की माझ्या मरणानंतर काय होणार.''

अभिनेत्रीने लिहिले आहे, "या प्रश्नाचे उत्तर जेव्हा मी माझ्या धर्मात शोधले तेव्हा मला कळले की, हे आयुष्य मराणानंतरचे आयुष्य चांगले बनवण्यासाठी आहे. ते कोणत्याही प्रकारे जास्त चांगले असेल, जेव्हा व्यक्ती जन्म देणाऱ्याच्या हुकुमानुसारे आयुष्य घालवेल आणि संपत्ती, प्रसिध्दी याला महत्त्व देणार नाही, तर गुन्हेगारीचे आयुष्यातून वाचून माणसुकीची सेवा करेल आणि जन्म देणाऱ्याच्या मार्गदर्शनाने पुढे जाईल. यासाठी मी हे शो-बिजचे आयुष्य सोडून देऊन माणुसकीच्या सेवेसाठी आणि जन्म देणाऱ्याच्या हुकुमानुसार चालण्याचा पक्का विचार करीत आहे. तमाम भावा बहिणींना विनंती आहे की मला शो-बिजच्या कोणत्याही कामासाठी आमंत्रण देऊ नका. खूप खूप आभार.''

ABOUT THE AUTHOR

...view details