हैदराबाद- अभिनेत्री समीरा रेड्डीने खुलासा केला आहे की तिने आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माच्यावेळी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. तुलनेने दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी इतका त्रास झाला नसल्याचे तिने सांगितले.
तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल बोलणारी समीरा हिला हंस हा मुलगा आहे आणि नवीन जन्मलेली न्यरा ही मुलगी आहे. तिचे गर्भारपणात वजन १०५ किलो झाले होते. त्यामुळे तिला खूप संघर्ष करावा लागल्याचे तिने सांगितले.
मदर्स डेच्या निमित्ताने समीराने आपल्या मातृत्वाची कहाणी पोर्टलवर शेअर केली आणि म्हणाली, "जेव्हा मी मुलगा हंसच्या वेळी गरोदर होते, तेव्हा मला वाटले की पेज थ्रीवर हौशी फोटोग्राफर्ससमोर वावरणाऱ्या मॉम पैकी मी परफेक्ट बंप असणारी एक असेन. माझे आईपणाची दृष्टी ग्लॅमर्सच्या जगातून आलेली होती. पण नऊ महिन्यानंतर माझे वजन १०५ किलो झाले, मला एक सुंदर मुलगा होऊनही मी निराश झाले होते. माझा नवरा अक्षई वर्दे मुलाला फिडींग करण्यापासून ते डायपर चेंज करण्यापर्यंतची सर्व कामे करीत होता. यावेळी मला इतकेच वाटले की इतर अभिनेत्री बाळंतपणानंतर एकच महिन्यात कशा काय कामावर परतत असतील.''
समीराने यापूर्वीच सांगितले होते की, तिच्या पहिल्या बाळंतपणाने वास्तव आणि सेलेब्रिटींचा अवास्तव जगण्यातील दबाव याबद्दलच्या भावनांना छेद मिळाला. समीराला नंतर लक्षात आले की खोलवर असलेली समस्यांवर होमीओपॅथीच उपाय असतो.
माझ्या सासूबाई म्हणाल्या की, ''तुझं बाळ निरोगी आहे, तुझा नवरा पाठिंबा देणारा आहे, तरीही तू निराश का?'' माझ्याकडे याचे उत्तर नव्हते. मला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर मी रडले., मी तिथे हंससाठी नसल्याबद्दल अपराधी वाटत होते. हे जवळपास वर्षभर सुरू होते. मी अनेकवेळा कोलमडले होते. फिल्म इंडस्ट्रीपासून मी पूर्णपणे दुरावले होते. माझं वजन अजूनही १०० किलोग्रॅम होते आणि मला अॅलोपेशिया एरेटा असल्याचे निदान झाले; केसांची गळती वाढली होती. त्यावेळी मला जाणवलं की ही एक खोल समस्या आहे; मग मी मी होमिओपॅथीशी संपर्क केला. आम्हाला सांगण्यात आले की जास्त वजनाचे मुल असणे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये २ प्रतिभावान बहिणींसह वाढण्याचा दबाव आणि सतत इंडस्ट्रीत होणारी चिकीत्सा हे माझ्या अडचणींच्या मागचे खरे कारण आहे. शेवटी मला एक नवीन व्यक्ती असल्यासारखे वाटलं. ", असे समीरा म्हणाली.
गेली दोन वर्षे सोशल मीडियापासून दूर गेलेल्या समीराने याबद्दलही सांगितले. समीरा म्हणाली की, जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा तिची ९०% फॉलोअर्स पुरुष होते परंतु आता त्यातील ७०% महिला आहेत. तिच्या चाहत्यांमध्ये झालेला हा बद्दल एक साध्या झालेली मोठी गोष्ट असल्याचे ती मानते. तेझ या २०१२ मध्ये आलेल्या बॉलिवूड चित्रपटात समीराने अखेरचे काम केले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तिचे बिझनेसमॅन अक्षई वर्देसोबत लग्न झाले होते.
हेही वाचा - मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; कोरोनाग्रस्त अभिनेत्याने 'मी पुन्हा येईन' म्हणत सोडला प्राण