मुंबई: सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर नेपोटिझ्मचा विषय पुन्हा रंगला आहे आणि त्याच कारणामुळे आलिया भट्ट, करण जोहर, सोनम कपूर यांच्यासह स्टार किड्सना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत करीना कपूर खानने अलीकडेच एका पोर्टलला सांगितले की, नेपोटिझ्मचा विषय तिला "विचित्र" वाटतो आणि स्टार बनवण्याची किंवा तोडण्याची ताकद प्रेक्षकांनाच आहे.
एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "21 वर्षे काम फक्त नातलगांमुळे झाले नसते. ते शक्य नाही. सुपरस्टार्सच्या मुलांची मी यादी देऊ शकते की ज्यांना या मार्गाने यश मिळू शकलेले नाही.''
करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर तिच्या आधीच बॉलिवूडमध्ये प्रस्थापित अभिनेत्री होती. दोघीही रणधीर कपूर आणि बबिता यांच्या मुली आहेत.
तिच्या या पार्श्वभूमीबद्दल बोलताना करिना म्हणाली, ''हे कदाचित विचित्र वाटेल पण मलाही संघर्ष करावा लागला. खिशात केवळ १० रुपये घेऊन येणाऱ्या व्यक्ती इतके हे रंजक असणार नाही. होय, ते तसे झाले नाही आणि याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू शकत नाही. "
करिनाच्या मते, कोण स्टार बनावा याचा अंतिम निर्णय प्रेक्षक घेतात. तिने अक्षयकुमार आणि शाहरुख खान या आऊटसायडर्सचे उदाहरण दिले, जे या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी
"प्रेक्षकांनी आम्हाला बनवलं आहे, इतर कुणीही बनवलं नाही. तेच लोक बोट दाखवून इशारा करीत आहेत, ते केवळ नातलगवादी स्टार्सना बनवत आहेत. आप जा रहे हो ना फिल्म देखणे? मत जाओ. कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करीत नाही. त्यामुळे मला हे समजत नाही. मला ही संपूर्ण चर्चा विचित्र वाटते,'' असे करिना म्हणाली.
"आज आपण निवडलेल्या आमच्या अनेक बड्या अभिनेत्यांमध्ये, अक्षय कुमार असोत किंवा शाहरुख खान असोत की ,आयुष्मान खुराना असो की राजकुमार राव, हे सर्व बाहेरचे लोक आहेत. ते यशस्वी अभिनेते आहेत कारण त्यांनी कष्ट केले आहे. आम्ही देखील खूप मेहनत केली आहे. आलिया भट्ट असो की करिना कपूर, आम्ही देखील खूप परिश्रम घेतले आहेत. तुम्ही आम्हाला पाहाता आणि आमचे चित्रपट एन्जॉय करता. त्यामुळे प्रेक्षकच आम्हाला घडवू शकतात किंवा रोखू शकतात.'', असे ती पुढे म्हणाली.
वर्क फ्रंटवर करिना आता आमिर खानसोबत लालसिंग चड्डामध्ये दिसणार आहे. टॉम हॅन्क्स यांच्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.