मुंबई- अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'मध्ये आयटम नंबर 'ऊं अंटावा' फेम अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सामंथा नुकतीच मुंबईत चौथ्या 'क्रिटिक' चॉईस अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात समांथा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत आली. मात्र इंटरनेटवर नेटिझन्स अभिनेत्रीला तिच्या ड्रेसमुळे प्रचंड ट्रोल करत आहेत.
सामंथाने काय परिधान केले होते?
10 मार्च रोजी मुंबईत झालेल्या 'क्रिटिक' चॉईस अवॉर्ड्स'च्या चौथ्या आवृत्तीत सामंथा प्लंजिंग नेकलाइन कॉर्सेटसह फ्लोय ग्रीन-रॅप ड्रेसमध्ये दिसली होती.
अभिनेत्री सामंथाने अॅक्सेसरीज वगळता न्यूड-टोन्ड मेक-अप आणि पोनीटेलची निवड केली होती. रेड कार्पेटवर चालताना ती खूपच सुंदर दिसत होती.
'काय घातले आहे मॅडम'
आता जेव्हा या कार्यक्रमाची सोशल मीडियावर झलक पाहायला मिळाली तेव्हा नेटकऱ्यांच्या नजरा सामंथा रुथ प्रभूच्या रेज कार्पेट लूककडे गेल्या. ट्रोल्सला दूर राहता आले नाही आणि त्यांनी तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे अभिनेत्रीची खिल्ली उडवायला सुरुवात केली.