मुंबई- अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) ही कठोर फिटनेस नियमांचे पालन करण्यासाठी ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सना प्रेरित करण्यासाठी अभिनेत्री नेहमी तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. तिच्या नवीन रीलमध्ये, समांथा लेव्हल-अप चॅलेंज ( level up challenge ) स्वीकारताना दिसत आहे.
सामंथा रुथ प्रभूने ( Samantha Ruth Prabhu ) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये कॅलरी क्रश ( crushing calories ) करताना दिसत आहे. तिचा ट्रेनर जुनैद शेखच्या सूचनेनुसार, समंथा स्क्वॅट गेमसाठी मेहनत करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना, सामंथाने लिहिलंय: "२०२२ ची सुरुवात या विना उपकरण 'लेव्हल-अप' आव्हानासह किकस्टार्ट करा आणि बर्न अनुभवा."
अभिनेत्री सामंथाने पुढे तिच्या फॉलोअर्सना आव्हान स्वीकारण्यास सांगितले आणि लिहिले, "जेव्हा माझा प्रशिक्षक जुनैद शेख मला आव्हान देतो.. मी तुम्हाला आव्हान देते .. चला हे 'लेव्हल-अप' आव्हान स्वीकारा..."