मुंबई - आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. या जनता कर्फ्यू दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कलाविश्वातील सेलेब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. अभिनेता सलमान खाननेही एका व्हिडिओद्वारे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या बरेच कलाकार घरी बसून सेल्फ आयसोलेशनमध्ये राहत आहेत. अनेक चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलल्यामुळे कलाकार आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. सलमान खान देखील मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करत आहे. त्याच्या भाच्यासोबत बागेत जाऊन वेळ घालवत आहे. तसेच आपल्या चित्रकलेच्या छंदालाही तो वेळ देत आहे.
हेही वाचा -खेळायला जाण्यासाठी हट्ट करणारा 'चैत्या' देखील पाळणार 'जनता कर्फ्यू'