महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

2022 मध्ये या 10 चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर राज्य करणार सलमान खान - Salman New Year Movies

सलमान खान त्याच्या चाहत्यांना कधी ईदला तर कधी दिवाळीला गिफ्ट देत असतो. आज (27 डिसेंबर) सलमान भाईचा 56 वा वाढदिवस आहे, त्यामुळे या खास प्रसंगी आम्ही सलमान खानच्या आगामी 10 चित्रपटांबद्दल भाष्य करणार आहोत. समान भाईचे हे चित्रपट 2022 मध्ये मोठा बदल घडवू शकतात.

सलमान खान
सलमान खान

By

Published : Dec 27, 2021, 3:34 PM IST

Updated : Dec 27, 2021, 6:45 PM IST

मुंबई -सलमान खान केवळ बॉलिवूडचाच नाही तर बॉक्स ऑफिसचाही गॉडफादर आहे. दरवर्षी त्याच्या चित्रपटांना तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागतात. सलमान कधी ईदला तर कधी दिवाळीला त्याच्या चाहत्यांना भेट देत असतो. आज (27 डिसेंबर) सलमान भाईचा 56 वा वाढदिवस आहे, त्यामुळे या खास प्रसंगी आम्ही सलमान खानच्या आगामी 10 चित्रपटांबद्दल भाष्य करणार आहोत. सलमान भाईचे हे चित्रपट 2022 मध्ये मोठा बदल घडवू शकतात.

  1. किक-2 :सलमान खानच्या 'किक' (2014) या चित्रपटाचा सिक्वेल 2022 मध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियादवाला करीत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस होती, मात्र या चित्रपटाच्या सिक्वलसाठी अद्याही अभिनेत्री सापडलेली नाही. सध्या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  2. बुलबुल मॅरेज हॉल :रोहित अय्यर दिग्दर्शित 'बुलबुल मॅरेज हॉल' या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेजी शाह त्याच्या सोबत असेल आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर देखील या चित्रपटात मनोरंजन करणार आहे. या चित्रपटासाठी 2022 वर्षातील तारीख निश्चित करण्यात आली आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  3. टायगर-3 :मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटावर काम सुरू आहे. पुढील वर्षी (2022) जानेवारीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत होणार आहे. येथे सलमान आणि कॅटरिना चित्रपटाच्या रोमँटिक सीनसाठी शूट करणार आहेत. हा चित्रपट एप्रिल 2022 मध्ये रिलीज होणार आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  4. शेरखान :मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान त्याचा धाकटा भाऊ सोहेल खानसोबत 2022 मध्ये 'शेरखान' चित्रपटावर काम सुरू करू शकतो. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट अडकला आहे. सोहेल खानचा सलमानसोबतचा हा चौथा चित्रपट असणार आहे, जो पुढील वर्षी धमाका करू शकतो.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  5. दबंग-4 :'दबंग' फ्रँचायझीचा चौथा चित्रपट देखील 2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटाच्या चौथ्या भागात, चुलबुल पांडे ही सलमान खानची व्यक्तिरेखा आणखी मजेदार बनवण्यावर काम केले जात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्रभुदेवा 'दबंग-4' चित्रपटाचे दिग्दर्शनही करताना दिसणार आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  6. धाक :'अँतीम - द फायनल ट्रुथ' या चित्रपटातून धमाका केल्यानंतर सलमान खान 2022 मध्ये मेहुणा आयुष शर्मासोबत पुन्हा एकदा चित्रपट करताना दिसणार आहे. 'धाक' असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला करणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  7. कभी ईद कभी दिवाळी :गेल्या दोन वर्षांपसून सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाची वादळी चर्चा सुरू आहे. फरहाद सम्जीच्या दिग्दर्शनाखाली बनणार असलेला हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  8. नो एन्टी में एन्ट्री :2005 मध्ये रिलीज झालेल्या 'नो एंट्री' या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग 'नो एन्ट्री में एन्ट्री' असेल. या चित्रपटावर काम सुरू आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि फरदीन खान पुन्हा एकदा सलमान खानसोबत मस्ती करताना दिसणार आहेत. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  9. बजरंगी भाईजान 2 :अलीकडेच 'RRR' चित्रपटाच्या कार्यक्रमात सलमान खानने 'बजरंगी भाईजान-2' चित्रपटाची घोषणा केली. सलमान खाननेही याबद्दल सांगितले होते की, चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये हा चित्रपट पुन्हा धमाल करू शकतो. बजरंगी भाईजानने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
  10. 'पठाण' :त्याचबरोबर सलमान खान मित्र शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच घोषणा करण्यात आलेल्या या चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉन अब्राहम या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दीपिका पदुकोण मुख्य अभिनेत्री आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहे.
    2022 मधील सलमानचे चित्रपट
Last Updated : Dec 27, 2021, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details