मुंबई -अभिनेता सलमान खान सध्या शेतीकामे करण्यात व्यस्त आहे. सलमान शेतात काम करत असून ट्रॅक्टर चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सलमानने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही शेअर केला आहे. 'फार्मिंग' असे कॅप्शन दिलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
सलमान शेतीकामात व्यस्त; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - सलमान खान लेटेस्ट बातमी
सलमानच्या या व्हिडिओला १.३ मिलियनहून अधिक हिट्स मिळाले आहेत. यापूर्वी सलमानने शेतातील एक फोटो शेअर करत 'रिस्पेक्ट टू ऑल द फार्मर्स' असे कॅप्शन दिले होते.
सलमानच्या या व्हिडिओला १.३ मिलियनहून अधिक हिट्स मिळाले आहेत. यापूर्वी सलमानने शेतातील एक फोटो शेअर करत 'रिस्पेक्ट टू ऑल द फार्मर्स' असे कॅप्शन दिले होते. यानंतर या दुसऱ्या व्हिडिओला 'दाने दाने पे लिखा होता है खानेवाले का नाम' असे कॅप्शन देत 'जय जवान जय किसान' असेही लिहिले आहे.
दबंग ३ हा सलमानचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर राधे या सिनेमातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी काळात सलमानचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपटही येणार असल्याची चर्चा आहे.