महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बिग बॉस'मध्ये सलमान म्हणाला माझ्या क्रश 'किरण'वर शाहरुखने बनवला सिनेमा - Ajay Devgan latest news

बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सलमानने शाहरुख खानच्या डर चित्रपटाची मस्करी केली आहे. तो म्हणाला यातील किरण या आपल्या क्रशवर शाहरुखने सिनेमा बनवला होता. अजय देवगण आणि काजोल त्यांच्या तान्हाजी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस'मध्ये आले होते.

Salman Khan
सलमान खान

By

Published : Jan 6, 2020, 4:42 PM IST

मुंबई - सुपरस्टार शहरुख खनचा १९९३ मध्ये आलेल्या 'डर' चित्रपटातील वेड्या प्रेमीचा अवतार त्याच्या आजवरच्या सर्वोत्तम अभिनयापैकी एक समजला जातो. चितत्रपटात किरण ( जुही चावला ) साठी वेडा झालेला प्रियकर त्याने रंगवला होता. आजही तो सिनेमा पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.

शाहरुखचा दोस्त असलेल्या सलमानने 'डर'मधील त्याच्या भूमिकेची मस्करी केली आहे. किरण या आपल्या जुन्या क्रशवर शाहरुखने सिनेमा बनवल्याचे त्याने म्हटलंय.

'बिग बॉस'च्या 'विकेंड का वार'मध्ये सलमान बोलत होता. अजय देवगण आणि काजोल यावेळी पाहुणे म्हणून आले होते. यावेळी बोलताना सलमान म्हणाला, की ''किस्सा तिथूनच सुरू झाला. मी माझी घटना शाहरुखला सांगितली आणि त्याने सिनेमा बनवून टाकला.''

असं पहिल्यांदाच घडलं की 'विकेंड का वार'मध्ये पहिल्यांदाच सलमानने शहारुखचे नाव घेतले. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमात ज्या प्रमाणे शाहरुखने स्वागत केले होते अगदी तसेच सलमानने ट्रेनमधून स्टेजवर अवतरलेल्या काजोलचे स्वागत केले. यात फरक इतकाच होता की कोणीच धावत नव्हते.

बिग बॉसचे अलिकडचे काही भागात सलमान चिडलेला दिसला. यात रश्मी देसाईवर भडकलेला सलमान पाहायला मिळाला. सलमानला आपल्या क्रूचा होत असलेला अपमान सहन झाला नाही. सलमान रश्मिला म्हणाला, ''रश्मि, कॅमेरामनला उलट बोलत आहेस, तुला वाटतं की निगेटीव्ह दाखवत आहोत आम्ही. तर मी तुला सांगतोय आता गेट उघडत आहे, तू जाऊ शकतेस.''

ABOUT THE AUTHOR

...view details