मुंबई - बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि झरीन खान यांची भूमिका असलेला 'वीर' (2010) या चित्रपटाचे निर्माते विजय गलानी यांचे बुधवारी रात्री लंडनमध्ये निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते लंडनमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार घेत होते. विजय गलानी हे सलमान खानच्या 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाचेही निर्माते होते.
विजय गलानी यांनी बॉलीवूडमध्ये अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि बिपाशा बसू यांच्या भूमिका असलेल्या अजनबी (2001), गोविंदा आणि मनीषा कोईराला यांच्यासोबत अचानक (1998), विद्युत जामवाल आणि श्रुती हासन यांच्यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. 'द पॉवर' सारख्या अनेक चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली.