मुंबई- अभिनेता सलमान खाननं बॉलिवूडमध्ये आपली चांगलीच छाप उमटवली आहे. भाईजानच्या केवळ नावावरच अनेक चित्रपट हिट ठरतात. सलमानच्या चाहत्यांची हीच क्रेझ पाहता आता तो लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता सलमानने स्वत: यावर आपली बाजू मांडली आहे.
सलमान खान निवडणूक लढवण्याच्या वृत्तावर म्हणतो.. - bharat
सलमान मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार असल्याचेही वृत्त गेल्या काही दिवसांपासून समोर येत होते

आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसून कोणत्या पक्षाचा प्रचारही करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सलमान मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार असल्याचेही वृत्त गेल्या काही दिवसांपासून समोर येत होते. अशात आपल्या ट्विटरवरून ट्विट करत सलमानने या सर्व बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलाकारांना मतदानाविषयी जनजागृती करणारे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती ट्विटरवरून केली होती. ज्यानंतर सलमानने याचे महत्त्व सांगत सर्वांनी मतदान करावे, असा सल्ला दिला होता. सलमान लवकरच अली अब्बास जफरच्या 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. याशिवाय त्याने नोटबुक चित्रपटाची निर्मितीही केली आहे. या चित्रपटातून तो प्रनूतन बहलला लॉन्च करत आहे.