मुंबई (महाराष्ट्र) - गायिका-अभिनेत्री शहनाज गिल एखाद्याची फिरकी घेण्यासाठी प्रसिध्द आहे. ती सलमान खान होस्ट करीत असलेल्या बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेमध्ये आली होती. अलिकडेच कॅटरिनाचे विकी कौशलसोबत लग्न झाले आहे. सलमान आणि कॅटरिना पूर्वी डेट करीत असल्याच्या अफवा होत्या. शहनाझने यावेळी कॅटरिनावरुन सलमानची मस्त फिरकी घेतली.
पार्टनर, मैने प्यार क्यूं किया आणि आगामी टायगर 3 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या सलमान आणि कॅटरिना यांचे जवळचे नाते आहे. पूर्वी ते डेट करत असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. बिग बॉस 15 च्या फिनाले एपिसोडमध्ये शहनाझ गिलने सलमानची चांगलीच फिरकी घेतली. शहनाझला पंजाबची कॅटरिना म्हटले जाते. यावर बिग बॉस १५ च्या फिनालेत पोहोचलेल्या शहनाझने सलमानची कॅटरिनावरुन मस्करी केली.
ती म्हणाली, "मैं पंजाब की कॅटरिना कैफ से इंडिया की शहनाज गिल हो गई हू क्यूं की अब इंडिया की कॅटरिना कैफ तो पंजाब की कॅटरिना बन चुकी है." सलमान हसला आणि तिच्याशी सहमत झाला. यावर ती पुढे म्हणाली, "सर आप खुश रहो बस" आणि लगेच पुढे म्हणाली, "स्वारी मैं ज्यादा तो नहीं बोल रही."