महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गुरु - युलिया वंतूरचे 'मैं चला' गाणे रिलीज, सलमानच्या चाहत्यांना पर्वणी - सलमान खान आणि प्रज्ञा जैस्वाल

गुरु रंधवा आणि युलिया वंतूर यांनी गायलेला 'मैं चला' हा लव्ह ट्रॅक टी-सीरीज यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यामध्ये बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि साऊथ अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

'मैं चला' गाणे रिलीज
'मैं चला' गाणे रिलीज

By

Published : Jan 22, 2022, 2:12 PM IST

मुंबई- गुरु रंधवा आणि युलिया वंतूर यांनी गायलेला 'मैं चला' हा लव्ह ट्रॅक शनिवारी (22 जानेवारी) रिलीज झाला आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि साऊथ अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल या गाण्यामध्ये मुख्य स्टारकास्ट आहेत. या गाण्याची झलक गुरु रंधावाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

'मैं चला' हे गाणे सलमानच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचा एक फोटो आणि प्रोमोही शेअर केला आहे.

गुरूने याआधी सांगितले होते की, ''मी हे गाणे युलिया वंतूरसोबत शेअर करत असल्यामुळे मी खूप आनंदी आहे. ती केवळ एक अप्रतिम कलाकार नाही तर तिच्या आवाजाचा टोन खूप वेगळा आहे. मी पैज लावतो की हे गाणे लोकांना खूप आवडेल.''

सलमान खान आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्या भूमिका असलेल्या या लव्ह ट्रॅकचे दिग्दर्शन शबिना खान यांनी केले आहे. हे गाणे शब्बीर अहमद यांनी संगीतबद्ध आणि लिहिले आहे. गुरू रंधावासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना युलिया वंतूर म्हणाली की, ''मैं चला हे खूप भावूक गाणे आहे, खूप प्रेमाने लिहिलेले आहे. आम्ही त्यात आमचे हृदय ठेवले आहे आणि मला आशा आहे की ते लोकांच्या आत्म्याला स्पर्श करेल, मी गुरूंचा आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तो एक अप्रतिम कलाकार आहे''.

सलमान खान आणि भूषण कुमार निर्मित 'मैं चला' हे गाणे 22 जानेवारी रोजी टी-सीरीज यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले.

हेही वाचा -शेतकरी 'फास' का लावून घेतो याची उत्तरं शोधणाऱ्या ‘फास’चा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details