मुंबई - सलमान खान नेहमी सोशल मीडियावर वेगळे टॅलेंट शोधत असतो. यावेळी त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याची भरपूर चर्चा होत असून त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. एका दिव्यांग मुलीने सलमानचे सुंदर पेंटिंग बनवले आहे. याचा हा व्हिडिओ असून सलमानने तिच्या या कलेचे खूप कौतुक केले आहे.
पाहा, पेंटिंग पाहून भाईजान सलमान का झाला हळवा? - Dabang 3
सलमान खानचे फॅन्स त्याच्यावर भरपूर प्रेम करीत असतात. सोशल मीडियावर याची दखल तो घेत असतो. आता त्याने शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेत आहे. यात एक दिव्यांग मुलीने त्याचे पेंटिंग पायाने रेखाटले आहे.
![पाहा, पेंटिंग पाहून भाईजान सलमान का झाला हळवा?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3861596-thumbnail-3x2-sallu.jpg)
हा व्हिडिओ पोस्ट करीत सलमानने लिहिलंय, ''देव हिचे भले करो, हिच्या प्रेमाची उतराई तर करु शकत नाही. परंतु हिच्यासाठी प्रार्थना जरुर करु शकतो.'' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते की सलमानचे फॅन्स त्याच्यावर किती प्रेम करतात. भाईजानही त्यांचे कौतुक करायला कंटाळा करीत नाही.
सलमान सध्या 'दबंग ३' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात सोनाक्षी आणि सलमानशिवाय अरबाज खान, माही गिल आणि दाक्षिणात्य कलाकार सुदीप विलनदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. तर विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना चित्रपटात सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.