महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमानच्या कुटुंबीयांनी माझं 'वाटोळं' केलं, 'दबंग' दिग्दर्शकाचा आरोप

सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या भावांनी आपल्या प्रकल्पांची तोडफोड केली असल्याचा आरोप दबंग दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी केला आहे. सोशल मीडियावर दीर्घ पोस्ट लिहिताना दिग्दर्शकाने इंडस्ट्रीतील गुंडगिरीचा अनुभव शेअर केला आहे.

Abhinav Singh Kashyap
दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप

By

Published : Jun 16, 2020, 5:09 PM IST

Updated : Jun 16, 2020, 7:30 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला बॉलिवूडचा घराणेशाहीवाद जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. दबंगचा दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यपने सुशांत सिंहच्या निधनाला बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री जबाबदार असल्याचे सांगत सुशांतच्या आत्महत्येच्या तळाशी जाऊन चौकशी व्हावी अशी मागणी पोलिसांच्याकडे केली आहे. यासंबंधी अभिनवने फेसबुकवर लिहिलेली पोस्ट आता व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने सलमान खानचे कुटुंबीय आणि यशराज फिल्म्स आणि फिल्म इंडस्ट्रीवर अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

सुशांतसिंह राजपूतचा आत्महत्या करण्यास यशराज फिल्म्सने प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनव कश्यपने आपल्या पोस्टमध्ये केलाय. या अँगलमधून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे त्याने म्हटलंय. या प्रकराच्या एजन्सीज कलाकारांचे करियर बनवत नाहीत तर बिघडवतात असेही त्याने म्हटलंय. सुशांतच्या आत्महत्येने इंडस्ट्रीतील या मोठ्या समस्येला चव्हाट्यावर आणले आहे. यात आमच्यापैकी कोणीही डिल करीत असतो. खरेतर असे कोणते कारण असेल की कुणाला तरी आत्महत्या करायला भाग पाडले जात असेल? मला भीती आहे की #metoo सारख्या आंदोलनाला सुरूवात होणार नाही.

अभिनव सिंह कश्यपने सलमान खानचे कुटुंबियांच्यावर आपले करियर उध्वस्त केल्याचा मोठा आरोप केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''माझा अनुभवही याहून वेगळा नाही आणि मलाही शोषणाचा त्रास सहन करावा लागला आहे. अरबाज खान आणि सोहेल खान यांनी मला दबंग २ च्या निर्मितीमधून हाकलले कारण त्यांना माझ्यावर नियंत्रण हवे होते. यासाठी त्यांनी मला भीती घालण्याचा, धमकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी श्री अष्टविनायक फिल्म्सचा माझा प्रोजेक्टही अरबाजने बिघडवून टाकला. राज मेहतांच्या सांगण्यावरुन मी हा प्रोजेक्ट साईन केला होता. माझ्यासोबत काम केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकीही त्याने दिली होती. मी श्री अष्टविनायक फिल्म्स ला पैसे परत केले आणि वायकॉम पिक्चर्समध्ये गेलो. त्यांनीही असेच केले. यावेळी नुकसान करणारा सोहेल खान होता आणि त्याने तिथले सीईओ विक्रम मल्होत्राला धमकी दिली होती. माझा प्रोजेक्ट बारगळला होता. मी सायनिंग केलेली ७ कोटी ९० लाख इतकी रक्कम परत केली. त्यानंतर माझ्या मदतीला रिलायन्स एंटरटेन्मेंट आली आणि आम्ही भागीदारीमध्ये बेशरम चित्रपटावर काम केले.''

अभिनवने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ''सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी बेशरमच्या प्रदर्शनामध्ये अडथळे आणायला सुरूवात केली. रिलीजच्या अगोदर माझ्या विरुध्द पीआरओने भरपूर चिखलफेक केली आणि माझ्याविरुध्द नकारात्मक मोहिम चालवली. त्यामुळे वितरक चित्रपट खरेदी करण्यासाठी घाबरले. रिलायन्स आणि माझ्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची क्षमता होती, परंतु ही लढाई सुरू झाली होती. माझे शत्रू माझ्याविरुध्द मोहिम चालवत होते आणि बॉक्स ऑफिस उध्वस्त व्हावे यासाठी चित्रपटाबद्दल आगपाखडत होते. परंतु तरीदेखील अशी तशी ५८ कोटींची कमाई सिनेमाने केली.''

अभिनव सिंह कश्यपने आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दलही भरपूर लिहिलंय. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर या गोष्टींचा पर्दापाश होणे आवश्यक असल्याचे त्याने म्हटलंय. त्याच्या आत्महत्येची सखेल चौकशी व्हावी यासाठी त्याने आग्रह धरलाय.

Last Updated : Jun 16, 2020, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details