मुंबई - कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ हजार मजूरांसाठी मदत करण्याची घोषणा सलमान खानने केली आहे. सलमान त्याच्या बिईंग ह्यूमन या एनजीओच्या मार्फत ही मदत करीत आहे.
FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले की, ''सलमान खान बिईंग ह्यूमनच्या सहाय्याने रोजंदारीवरी कामगारांच्या संघटनेपर्यंत पोहोचला आणि त्यांना मदतीची घोषणा केली आहे.''
तिवारी यांनी तपशील देताना सांगितले, ''सलमान खानचे बिईंग ह्यूमन फाऊंडेशन रोजंदारीवरील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. आमच्याजवळ ५ लाख मजूर आहेत. यातील २५००० लोकांना मदतीची अत्यावश्यकता आहे. बिईंग ह्यूमनने सांगितले की सर्व मजूरांची काळजी घेऊ. त्यांनी २५००० मजूरांचे अकाऊंट डिटेल्स मागितले आहे. कारण त्यांना ही मदत थेट कामगारांना करायची आहे.''
तिवारींनी पुढे सांगितले, ''त्या मजूरांशिवाय आमच्याकडे ४७००० मजूर आणखी आहेत. त्यांना आम्ही सपोर्ट करीत आहोत. हे लोक १ महिना आपले काम चालवू शकतात. आम्ही त्यांच्यासाठी रेशन जमा केले आहे. पण दुर्दैवाने ते घ्यायला येऊ शकत नाहीत. आम्ही त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत आहोत.''
तिवारी यांनी सांगितले की, बॉलिवूडच्या इतर सेलेब्रिटीजकडेही मदतीची मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडू अद्याप उत्तर आलेले नाही. निर्माता महावीर जैन यांना जेवण आणि आवश्यक वस्तु देण्यासाठी सांगितले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला करण जौहर, आयुष्मान खुराना, कियारा अडवाणी, तापसी पन्नू, सिद्धार्थ मल्होत्रा, नितेश तिवारी या लोकांनी रोजंदारीवरील कामकारांसाठी मदत करण्याची घोषणा केली होती. लॉकडाऊनमुळे अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा, विक्रमादित्य मोटवानी यांनीही रोजंदारीवरील कामगारांची चिंता व्यक्त केली होती.