मुंबई- आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी घेणं हे अनेक चाहत्यांचं स्वप्न असतं. अशात हा कलाकार समोर आला की चाहत्यांना सेल्फीचा मोह आवरत नाही. अनेकदा कलाकार चाहत्यांची ही ईच्छा पूर्ण करत त्यांची व्यवस्थित भेट घेतात तर अनेकदा चाहत्यांवरच भडकतात.
चाहतीनं हात पकडताच भडकला सलमान, पुढे काय झालं पाहा - कमेन्ट
सलमानला समोर पाहताच एका चाहतीने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या चाहतीला त्यानं स्मितहास्यही दिलं. मात्र, नंतर या चाहतीनं हात पकडवल्यावर भाईजानच्या चेहऱ्यावर राग पाहायला मिळाला.
बॉलिवूड भाईजान सलमान खानसोबतही नुकताच असाच प्रसंग घडला. सलमानला समोर पाहताच एका चाहतीने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या चाहतीला त्यानं स्मितहास्यही दिलं. मात्र, नंतर या चाहतीनं हात पकडल्यावर भाईजानच्या चेहऱ्यावर राग पाहायला मिळाला.
या घटनेनंतर सलमानच्या बॉडीगार्डनं लगेचच या महिलेला बाजूला केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेन्ट करत यात सलमानची काहीही चूक नसून चाहतीचं हे वागणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान भाईजान सध्या आपल्या 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.