मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अभिनेता सलमान खान आपला वेळ पनवेलमधील फार्महाऊसमध्ये घालत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ ३ जूनला दुपारी अलिबागजवळ धडकले. या वादळाने सलमान खानच्या फार्महाऊसचेही नुकसान केले होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सलमान खानने फार्महाऊसची साफसफाई करतानाचा आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
निसर्ग वादळानंतर सलमान खानने कर्मचाऱ्यासह केली फार्महाऊसची सफाई - जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सलमान खानने फार्महाऊसची साफसफाई करतानाचा आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
![निसर्ग वादळानंतर सलमान खानने कर्मचाऱ्यासह केली फार्महाऊसची सफाई सलमान खान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:10-7500677-11-7500677-1591430543915.jpg)
व्हिडिओमध्ये सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर देखील सलमानसोबत स्वच्छता करताना पाहायला मिळाली. हा व्हिडिओ शेअर करताना सलमान खानने 'स्वच्छ भारत' हे कॅप्शन दिले आहे. सलमान खान आणि युलियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.
सलमान खानने लॉकडाऊनमध्येही स्वत: ला कामात गुंतवले आहे. फार्महाऊसमध्ये असताना त्याने 'तेरे बीना' आणि 'भाई भाई' ही दोन गाणीही रिलीज केली आहेत. तेरे बीना या गाण्यामध्ये सलमानला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत पाहयला मिळाले. सलमानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच 'राधे-यूअर मोस्ट वॉन्टेड भाई' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी आणि रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.