महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दबंग-३' च्या सेटवरील आणखी एक फोटो व्हायरल, दमदार स्टाईलमध्ये दिसला 'चुलबुल पांडे' - दबंग

नर्मदा घाटावर हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. इंदौरच्या काही खास ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग करण्यात येणार आहे. दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर असलेले प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

'दबंग-३' च्या सेटवरील आणखी एक फोटो व्हायरल,

By

Published : Apr 2, 2019, 9:12 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खानच्या 'दबंग-३' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या इंदौरला रवाना झाली आहे. 'दंबग' चित्रपटात सलमान 'चुलबुल पांडे' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला फोटो सलमान खानने शेअर केला होता. आता या चित्रपटाच्या सेटवरील आणखी एक फोटो समोर आला आहे. तसेच, सलमानचे काही व्हिडिओ देखील त्याच्या फॅन्स पेजवरुन शेअर करण्यात आले आहे.

आता सलमान खानचा चुलबुल पांडेच्या रूपातील फोटो शेअर करण्यात आलाय. नर्मदा घाटावर हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. इंदौरच्या काही खास ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग करण्यात येणार आहे. दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर असलेले प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

मध्य प्रदेशच्या महेश्वर आणि मांडव येथे २० दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु राहणार आहे. महेश्वरच्या नर्मदा घाटावरच हा फोटो काढण्यात आला आहे. या ठिकाणी सलमान खानसह, अरबाज खान, सोनाक्षी सिन्हा आणि मनोज पाहवा यांचे सीन शूट करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details