पणजी- सलमान खान हा शिघ्रकोपी असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागलीय. तो एका कामानिमित्त गोव्यात पोहोचला होता. यावेळी समोर दस्तुरखुद्द सलमान भाईजानला पाहिल्यानंतर त्याचा एखाद्या चाहत्याला सेल्फी घेण्याचा मोह झाला नाही तरच नवल. पण यामुळे सलमानच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागले.
Video : सलमान भाई को गुस्सा क्यूँ आता है? - सलमान खानाने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्यांचा मोबाईल फोन हिसकावला
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अभिनेता सलमान खानाने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचा मोबाईल फोन हिसकावला. त्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र सुरू असून टीकाही केली जात आहे.
![Video : सलमान भाई को गुस्सा क्यूँ आता है? salman-khan-angry-on-fan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5875548-thumbnail-3x2-rr.jpg)
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अभिनेता सलमान खान अवतरल्याने त्याला पाहणाऱ्यांनी मोबाईल क्लिक केले. मागून सलमान येतोय हे पाहून एकाने त्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोन काढला. मागून येणाऱ्या सलमानला हे आवडले नसल्याचे नंतर स्पष्ट दिसून आले. त्याने चाहत्याच्या हातातील मोबाईलच हिसकावून घेतला. तो बिचारा अचानक झालेल्या या प्रकाराने बिथरून गेला. मात्र, उपस्थितांपैकी अनेकांना सलमानचे हे वागणे फारसे आवडले नाही.
सलमानचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला इतका राग येण्याचे काहीच कारण नव्हते, अशी कुजबुज त्याच्याही चाहत्यांमध्ये आहे.