मुंबई - सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा सध्या 'दबंग ३' च्या प्रमोशनमध्ये गुंतलेले आहेत. याच कारणासाठी ते स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओतही पोहोचणार आहेत. सोनाक्षी आणि सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप चर्चेत आहे. यात सोनाक्षी सलमानला सांगत आहे की, भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीदेखील तुझ्यासारखाच 'दबंग' आहे आणि तो गोलंदाजांची धुलाई करीत आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात येत्या १५ डिसेंबरला पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. यावेळी सलमान आणि सोनाक्षी 'दबंग ३' च्या प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओत दाखल होणार आहेत. विराटने नुकत्याचा पार पडलेल्या टी- २० सामन्यात वेस्ट इंडीज गोलंदाजांच्या नाकात दम आणला होता. तिसऱ्या सामन्यात २८ चेंडूत ७० धावा चोपताना ७ षटकार ठोकले होते.