महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाली' आता 30 डिसेंबरला होणार रिलीज - salman pooja

सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या नव्या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्याचवेळी सलमानचा आणखी एक चित्रपट 'टायगर-3' आता 2023 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

कभी ईद कभी दिवाली
कभी ईद कभी दिवाली

By

Published : Mar 3, 2022, 5:07 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग खान' म्हणजेच सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. वास्तविक, हा चित्रपट पूर्वी ईद (2023) च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, परंतु आता हा चित्रपट त्याआधी म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. कभी ईद कभी दिवाली आता 30 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

खरंतर, सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या नव्या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्याचवेळी सलमानचा आणखी एक चित्रपट 'टायगर-3' आता 2023 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

अशा परिस्थितीत सलमान खानच्या चाहत्यांसाठी 2023 सालची ईद दुहेरी साजरी होऊ शकते. कारण कदाचित 2023 मध्ये सलमान चाहत्यांना 'टायगर-3' चित्रपट पाहण्याची संधी मिळू शकेल.

'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये सलमानसोबत दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेशही दिसणार आहे.

सलमान आणि साजिदचा मागील चित्रपट 'किक' देखील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 200 कोटींची कमाई केली होती.

साजिदने चित्रपटाची अभिनेत्री पूजा हेगडेबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, 'हाऊसफुल-4' या चित्रपटात पूजासोबत काम केल्यानंतर ती या चित्रपटासाठी फिट असेल याची जाणीव झाली होती.

हेही वाचा -Kgf चॅप्टर 2 चा ट्रेलर 27 मार्च 2022 रोजी होणार रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details