मुंबई- बॉलिवूडचा 'दबंग खान' म्हणजेच सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमानने चाहत्यांना 'टायगर-3'ची रिलीज डेट सांगितली आहे. याआधी अभिनेत्याने त्याच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाची रिलीज डेट सांगून चाहत्यांना मोठी भेट दिली होती. खरंतर, सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे. सलमान खानचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
सलमान खानने 2023 ची ईद चाहत्यांसाठी दुहेरी उत्सवात बदलली आहे. कारण 2023 साली सलमान चाहत्यांना टायगर 3 चित्रपट पाहण्याची संधी देत आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेता विकी कौशलची पत्नी कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.