मुंबई - सलमानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. सलमान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा तिसऱ्यांदा एकत्रीत काम करणार आहेत. 'वॉन्टेड' आणि 'दबंग ३' नंतर दोघांची सुपरहिट जोडी नव्या सिनेमाच्या तयारी आहे. 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.
सलमानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई'ची झाली घोषणा - director Prabhu Dheva
'वॉन्टेड' आणि 'दबंग ३' नंतर दोघांची सुपरहिट जोडी नव्या सिनेमाच्या तयारी आहे. 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.
'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई'ची झाली घोषणा
'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट २०२० च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. राधे या चित्रपटाची घोषणा झाल्याचे ट्विट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केले आहे.
सलमान खान यंदाच्या ख्रिसमसमध्ये दबंग ३ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर पुढील वर्षी ईदला 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट भेटीस येणार आहे.