मुंबई - सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांचे प्रचंड आकर्षण ठरलाय. तो आपली आई सलमा खान यांच्यासोबत डान्स करताना दिसतोय. यातून मायलेकांमध्ये असलेल्या घट्ट नात्याची जाणीव होते.
'चीप थ्रिल्स' गाण्यावर सलमानचा आईसोबत सुरेख डान्स - Salman Khan
सलमान खानने आईसोबत नाचतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. यातून मायलेकांमध्ये असलेल्या घट्ट नात्याची जाणीव होते. हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
!['चीप थ्रिल्स' गाण्यावर सलमानचा आईसोबत सुरेख डान्स](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3915845-thumbnail-3x2-kk.jpg)
सलमानचा आईसोबत सुरेख डान्स
सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हडिओत तो सीन पॉल याच्या 'चीप थ्रिल्स' या गाण्यावर नाच करताना दिसतोय.
या गाण्यावर सलमा खान अत्यांत सुरेख नृत्य करताना दिसतात. यात त्या मुलाशी कौतुकाने चुंबन घेत, गाळाभेट घेत ताल पकडून नाचताना दिसतात. सलमानने या व्हिडिओला कॅप्शन दिलंय, आई म्हणतेय, 'बंद करा हे नाच गाणे'.