मुंबई - सलमान आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमानच्या आगामी किक चित्रपटाच्या सीक्वलमधून जॅकलिन फर्नांडिस आऊट झाली असून दीपिका पदुकोणने तिची जागा घेतली आहे. अशा प्रकारे दोघांची पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर जोडी पाहायला मिळणार आहे.
सलमान - दीपिका पहिल्यांदाच 'किक २'मध्ये येणार एकत्र - Kick2
सलमान खान आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहे. किकच्या सीक्वलमधून ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकेल.
सलमान - दीपिका
गेल्या काही महिन्यांपासून किक सिनेमाच्या सीक्वलची चर्चा रंगत असते. या चित्रपटात पुन्हा एकदा जॅकलिन झळकणार अशी चर्चा होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका यात महत्तवाची भूमिका साकारणार आहे. यात ती केवळ लिड रोलमध्येच नाही तर सलमान सारखीच अॅक्शन करताना दिसणार असल्याची चर्चा आहे.