महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करिना,सारानं अद्यापही 'ही' गोष्ट केली नाही, सैफचा खुलासा ऐकून व्हाल चकीत - जवानी जानेमन

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यात सैफनं सरताज सिंह नावाचं पात्र साकारलं होतं, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आता या प्रसिद्ध सीरिजबद्दल सैफनं एक खुलासा केला असून हे ऐकून तुम्हालाही आर्श्चयाचा धक्का बसेल.

सैफचा खुलासा ऐकून व्हाल चकीत

By

Published : Aug 1, 2019, 2:32 PM IST

मुंबई- बॉलिवूड नवाब सैफ अली खान सध्या सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. हा दुसरा सीझन स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यात सैफनं सरताज सिंह नावाचं पात्र साकारलं होतं, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

आता या प्रसिद्ध सीरिजबद्दल सैफनं एक खुलासा केला असून हे ऐकून तुम्हालाही आर्श्चयाचा धक्का बसेल. सैफचं म्हणणं आहे, की ही सीरिज सारा आणि करिनाने पाहिली की नाही याबाबत त्याला शंका आहे. तो म्हणाला, मला अशा अनेक प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळाल्या ज्यांनी मनापासून ही सीरिज पाहिली. तर काहींनी वारंवार ही सीरिज पाहिली. मात्र, मला नाही वाटत की माझ्या घरी कोणी ही सीरिज पाहिली. कारण, त्यांच्यातील कोणीही यावर मला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पुढे सैफ म्हणाला, ठीक आहे. आम्ही ही सीरिज फक्त त्यांच्या पाहण्यासाठी नाही तर प्रेक्षकांसाठी बनवली होती. मला या गोष्टीचा आनंद आहे, की पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा सैफनं व्यक्त केली. सैफ सेक्रेड गेम्सशिवाय 'लाल कप्तान', 'जवानी जानेमन', भूत पुलिस आणि तानाजी या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details