'जवानी जानेमन' या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर आता भेटीस आणले आहे. यात सैफ अली खान बेडवरुन बियर ओतताना दिसत असून दोन अज्ञात व्यक्ती त्याच्या बेडवर दिसत आहेत. नितीन कक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, सैफच्याच होम प्रोडक्शनमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
'जवानी जानेमन' चित्रपटाचे नवे रोमँटिक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला - 'जवानी जानेमन' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज
'जवानी जानेमन' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यात सैफ अली खान, आलिया बेदी आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ३१ जानेवारी २०२० ला हा चित्रपट रिलीज होईल.
!['जवानी जानेमन' चित्रपटाचे नवे रोमँटिक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला Jawaani Jaaneman](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5477912-thumbnail-3x2-ll.jpg)
या चित्रपटात अभिनेत्री तब्बूदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 'जवानी जानेमन' या चित्रपटात सैफ हा ४० वर्षीय वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही झळकणार आहे. हा तिचा पदार्पणाचा चित्रपट आहे. ती सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. यातील बहुतेकांना प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळालं. यानंतर आता अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया बेदीदेखील बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत असून नुकतंच तिनं आपल्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.
'जवानी जानेमन' हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होईल.